निलंबित पोलिस अधिकारी १२ वर्ष करत होता उजबेकिस्तानच्या महिलेवर बलात्कार

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. यातून तरुणी गरोदर राहिली असता. बंदुकीच्या धाकावर तिला तीन वेळा गर्भपात करण्यास ही भाग पाडल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.

SHARE
मुंबईतील एका पोलिस अधिकाऱ्यानेच १२ वर्ष एका उजबेकिस्तान महिलेला ब्लकमेल करून  तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उजबेकिस्तान महिलेने चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा भानुदास उर्फ अनिल जाधव विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पूर्वी ही जाधवला रायगड येथील रेव्ह पार्टी आयोजन करत अंमली पदार्थांचा पुरवठा केल्या प्रकरणी तत्कालीन गृहमंञी आर आर पाटील यांनी पोलिससेवेतून निलंबित केले होते.


मूळची रशियाच्या उजबेकिस्तानची राहणारी असलेली ३८ वर्षीय तक्रारदार हिंदी चिञपटात माँडलिंग करण्याच्या हेतूने २००३ मध्ये भारतात आली होती. सहा महिने अथक प्रयत्न करून ही तिला काम मिळाले नाही. त्यातच व्हिजा संपल्यामुळे ती चौकशी करण्यासाठी विमावतळावरील इमिग्रेशन कार्यालयात गेली. त्याठिकाणी तिची ओळख अनिलसोबत झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे फोन शेअर केले. अनिल वारंवार तिच्याशी जवळीकता साधून तिला आपल्या जाळ्यात ओढू लागला. चिञपटात काम देण्याच्या नावाखाली त्याने भेटायला बोलवून तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने तरुणीच्या नावाने भारतीय पासपोर्ट बनवून तिला खोटे कागदपञ बाळगल्या प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. यातून तरुणी गरोदर राहिली असता. बंदुकीच्या धाकावर त्याने तिला तीन वेळा गर्भपात करण्यास ही भाग पाडल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.


तसेच जाधव यांनी दिलेल्या ड्रग्जच्या अतीसेवनामुळे पुण्यातील एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्या मुलीच्या भावाने पोलिसात तक्रार केली होती. त्याची अनिल यांनी गोळी घालून हत्या केल्याचा आरोप या तरूणीने तक्रारीत केला आहे. या पूर्वी ही अनिल जाधव याला रायगड येथील रेव्ह पार्टी आयोजनात पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. त्या प्रकरणी तत्कालीन गृहमंञी आर.आर.पाटील यांनी त्याला निलंबित केले होते. मागील १२ वर्षापासून अनिल वेळोवेळी धमकावून अत्याचार करत असल्याची तक्रार या तरुणीने चेंबूर पोलिसात  दिली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या