आसनगावजवळील प्लास्टिक कंपनीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.
आसनगावजवळील वेहळोली गावात ही कंपनी आहे. कृष्णा प्रमोशन असं आग लागलेल्या या कंपनीचं नाव आहे. या कंपनीत ४०० ते ५०० कामगार काम करतात. कंपनीला आग लागल्यानंतर कामगारांमध्ये एकच खळबळ माजली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
आगीचे लोट मोठे असल्यामुळे येथील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्यापही अस्पष्ट आहे.