मस्जिद बंदर स्टेशनबाहेर झोपडपट्टीला आग, म.रे. विस्कळीत


SHARES

मस्जिद बंदर - येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. ही झोपडपट्टी मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकाला लागूनच आहे. झोपडपट्टी रेल्वे रूळांच्या खूपच जवळ असल्याने आणि आगीची तीव्रता जास्त असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या साधारण ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी सीएसटी आणि अन्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. शिवाय, धीम्या लोकल ट्रेन्समध्येही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 6 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा