विरारमध्ये मोबाइल शॉपमधील गोळीबारात २ जण जखमी

विरार पूर्व येथील कुंभारपाडा परिसरातील एका मोबाईल शॉपमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

विरारमध्ये मोबाइल शॉपमधील गोळीबारात २ जण जखमी
SHARES

विरार पूर्व येथील कुंभारपाडा परिसरातील एका मोबाईल शॉपमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाला असून, या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार करण्या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता एकाला पकडण्यात यश आलं आहे.

शॉप बंद

या गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. रविरारी रात्रीच्या सुमारास काही जण अचानक कुंभारपाड्यातील एका मोबाइल शॉपमध्ये शिरले. त्यावेळी मोबाइल शॉपचा मालक आपले शॉप बंद करण्याच्या तयारीत होता. या हल्लेखोरांनी मालकाला मोबाइल फोनबाबत विचारणा केली. त्यानंतर हल्लेखोर आणि मालकामध्ये वाद सुरू झाला. या हल्लेखोरांनी थेट पिस्तूल बाहेर काढत गोळ्या झाडण्यास सुरूवात केली.

२ जण जखमी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. यात २ जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, अचानक झालेल्या या गोळीबारामुळं विरार परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



हेही वाचा -

मुंबईसह राज्यातील नागरिकांना थंडीची चाहुल

काळाचौकीतील २ मुलांचा लोणावळ्यातील पवना डॅममध्ये बुडून मृत्यू



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा