Advertisement

मुंबईसह राज्यातील नागरिकांना थंडीची चाहुल

राज्याच्या बहुतांश भागातील ढगाळ वातावरणाची स्थिती कमी होऊन कोरडे हवामान निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबईसह राज्यातील नागरिकांना थंडीची चाहुल
SHARES

मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना थंडीची चाहुल लागली आहे. राज्याच्या बहुतांश भागातील ढगाळ वातावरणाची स्थिती कमी होऊन कोरडे हवामान निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. या वातावरणामुळं आठवड्याभरात राज्यात सर्वच ठिकाणी गारवा वाढला आहे. तसंच, काही ठिकाणी दाट धुकंही पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याशिवाय, मागील २ दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात ४ अंशानं घट झाली आहे.

१८ अंश सेल्सियस

रविवारी किमान तापमान १८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आलं. शुक्रवारपासून मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानं मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे. किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान कमी झालं आहे. राज्यात गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी किमान तापमान ११ ते १४ अंश सेल्सियसदरम्यान होते. दरम्यान, या बदलत्या वातावरणामुळं मुंबईकरांना साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे.

१३.८ अंश सेल्सियस

रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद इथं १३.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आलं. राज्यात किमान तापमान कमी झालं असताना कमाल तापमान मात्र, अजूनही ३० अंश सेल्सियसच्या आसपासच राहिलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या राज्यात सर्वच ठिकाणी कोरडं हवामान निर्माण होत आहे.

थंड वाऱ्यांचं प्रवाह

उत्तरेकडून राज्याच्या दिशेनं थंड वाऱ्यांचं प्रवाह सुरू आहेत. या संपूर्ण आठवड्यात राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळं १-२ दिवसांत गारव्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या संध्याकाळनंतर काहीसा गारवा जाणवत असून, पहाटे त्याची तीव्रता वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊसही झाला. सरासरीच्या आसपास गेलेलं विदर्भातील तापमान त्यामुळं पुन्हा वाढलं आहे.



हेही वाचा -

मुंबईकरांसाठी अंधेरीत मशीनमध्ये कपडे धुण्याची 'सुविधा’

मुंबईमध्ये घरात चक्क गांजाची लागवड



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा