वर्ल्ड कपवर सट्टा खेळणाऱ्या परराज्य टोळीचा पर्दाफाश

मुलुंड परिसरातील एका उच्चभ्रू वस्तीत काही जण पाकिस्तान-बांगलादेश सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवि सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक के

SHARE

इंग्लडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ वर सट्टा खेळणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  या कारवाईत पोलिसांनी मुकेश ठक्कर, योगेश ठक्कर, हार्दिक ठक्कर, कार्तिक ठक्कर, धवल ठक्कर या पाच सट्टेबाजांना अटक केली आहे. या आरोपींकडून सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


राजस्थानमध्ये सट्टा

मुलुंड परिसरातील एका उच्चभ्रू वस्तीत काही जण पाकिस्तान-बांगलादेश सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवि सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी ५ लॅपटाॅप, ११ मोबाइल फोन, ६ वायफाय डोंगल, २ डेबिटकार्ड, १५ हजार रोकड आणि दोन कार हस्तगत केल्या आहेत. हे दोघेही आॅनलाईन साईडद्वारे सट्टा लावत होते. तपासात या प्रकरणात अन्य काही आरोपींचा सहभाग निश्चित झाला. मात्र ते राजस्थानच्या उदयपूरमधून सट्टा खेळत होते. 


उदयपूर येथून अटक 

त्यानुसार मुलुंड पोलिसांनी त्या तिघांना उदयपूर येथून अटक केली आहे. या आरोपींवर यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. मुलुंड पोलिसांनी या आरोपींवर जुगार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवि सरदेसाई यांनी दिली. हेही वाचा -

अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटनखाण्यात सोडलं, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला अटक

लाखोंच्या कोकेन तस्करी प्रकरणी परदेशी महिलेला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या