अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटनखाण्यात सोडलं, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला अटक

त्या तीन मुलींना १५ मार्च रोजी न्यायालयात हजरच केले नाही. याबाबत थाॅमस संस्थेने मुलींबाबत चौकशी केली असता त्या वसतिगृहातून निघून गेल्याचं सांगण्यात आलं. पुन्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्याने त्या कुंटनखाण्याला भेट दिली असताना त्या तिन्ही मुली तेथेच असल्याचं नि

अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटनखाण्यात सोडलं, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला अटक
SHARES
मुंबईच्या रेड लाईट परिसरातून सोडवून आणलेल्या मुलींना पुन्हा कुंटणखान्यात ढकलणाऱ्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह एकाला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. कलंदर शेख, रवींद्र पांडे असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.


कुंटणखान्यावर कारवाईत 

मुंबईत शेख हे २००४ मध्ये नागपाडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ११ मार्च २००४ रोजी एका कुंटणखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईत तीन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं. या मुलींना १४ मार्च २००४ रोजी चेंबूरच्या नवजीवन महिला वसतिगृहात पाठवले होते. मात्र त्या तीन मुलींना १५ मार्च रोजी न्यायालयात हजरच केले नाही. याबाबत थाॅमस संस्थेने मुलींबाबत चौकशी केली असता त्या वसतिगृहातून निघून गेल्याचं सांगण्यात आलं. पुन्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्याने त्या कुंटनखाण्याला भेट दिली असताना त्या तिन्ही मुली तेथेच असल्याचं निदर्शनास आलं.

पगारवाढ रोखली 

 नियमाप्रमाणे मुलींना न्याय मंडळापुढे हजर करण्याऐवजी वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेटकडे पुन्हा सुपूर्द केल्या, ही बाब लक्षात आल्यानंतर  थाॅमस संस्थेने तत्कालिन पोलिस आयुक्त ए.एन. राॅय यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार शेख यांची पोलिस खात्याने तीन वर्ष पगारवाढ रोखली होती. तसंच त्यांच्याविरोधात मानवी तस्करी, अपहरण व अल्पवयीन मुलींची विक्री केल्याप्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला. या प्रकरणात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार नागपाडा पोलिसांनी शेख यांना औरंगाबाद तर पांडेला मुंबईतून अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा  -

लाखोंच्या कोकेन तस्करी प्रकरणी परदेशी महिलेला अटक

ट्रक चालकांना लुबाडणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा