ट्रक चालकांना लुबाडणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

क्षुल्लक कारणांवरून दोघांनी अफरोजसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. अफरोजच्या मदतीसाठी क्लिनर आला असता. त्यांनी क्लिनरला पैशांसाठी धमकावले.

  • ट्रक चालकांना लुबाडणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक
  • ट्रक चालकांना लुबाडणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक
SHARE

मुंबईच्या वडाळा परिसरात अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा वडाळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फारूख खान (20), शहदात याकुबअली शेख (22), आदील शमीउल्ला शेख (24) अशी या आरोपींची नावॆ आहेत.  मागील अनेक दिवसांपासून हे तिघे त्या परिसरातील ट्रक चालकांना लुटायचे.

ट्रक चालकाला भररस्त्यात लुटले

मशिदबंदर परिसरातील कंपनीतून खोपोली येथे माल सोडण्यासाठी तक्रारदार वाहन चालक अफरोज हुसेन आणि त्याचा क्लिनर वडाळा काँटनग्रीन मार्गे 6 जुलै रोजी दुपारी 4:30 वा जात होत. त्यावेळी काँटनग्रीन परिसरात त्याचे या तिघांनी ट्रक अडवला. क्षुल्लक कारणांवरून दोघांनी अफरोजसोबत वाद घालण्यास सुरूवात केली.  अफरोजच्या मदतीसाठी क्लिनर आला असता. त्यांनी क्लिनरला पैशांसाठी धमकावले. क्लिनरनेल पैसे देण्यास नकार दिल्याने या तिघांनी दोघांना गंभीर मारहाण करत त्याच्याकडील 2500 हजार  हिसकावून घेत पळ काढला.

एका तासात आरोपीला अटक

या प्रकरणी अफरोजने शिवडी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस उपायुक्त रश्मी करंदिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण मांडरे यांच्या पथकाने अवघ्या एका तासात आरोपींना अटक केली. यातील एका आरोपीच्या दुचाकीचा नंबर अफरोजने पाहिला होता. त्या दुचाकीच्या नंबरच्या मदतीने पोलिसांनी वडाऴ्यातून आरोपी फारूख खानला अटक केली. खानच्या चौकशीतून पोलिस इतर दोन आरोपींना अटक केली. यातील आदील हा टँक्सीचालक असून  शाहदात शेख हा रेशनींग दुकानदार आहे. तर फारूख मोबाइल दुरूस्तीचे काम करतो. या प्रकरणी शिवडी पोलिस अधिक तपास करत आहे.


हेही वाचा

दुर्घटनाग्रस्तांना सैफी हॉस्पिटलचा मदतीचा हात, ६ लाखांच्या मदतीची तरतूद


संबंधित विषय
ताज्या बातम्या