Advertisement

दुर्घटनाग्रस्तांना सैफी हॉस्पिटलचा मदतीचा हात, ६ लाखांच्या मदतीची तरतूद


दुर्घटनाग्रस्तांना सैफी हॉस्पिटलचा मदतीचा हात, ६ लाखांच्या मदतीची तरतूद
SHARES

विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या पीडितांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारताची एक आघाडीची टेक्निकल मॅनपॉवर आऊटसोर्सिंग कंपनी, आरवी एनकॉनने मुंबईतील सैफी हॉस्पिटलसह सहयोगाची घोषणा केली. ओपीडीमधील कमी आवक असलेल्या समूहाच्या उपचारांसाठी तसेच इतर संबंधित सेवांसाठी कंपनीतर्फे दरवर्षी ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा करार ३ वर्षांसाठी करण्यात आला आहे.

रूग्णांच्या वैद्यकीय चाचण्या

या सहयोगाच्या माध्यमातून आरवी एनकॉन सैफी हॉस्पिटलच्या फ्री आऊट पेशंट डिपार्टमेंट (ओपीडी) मध्ये येणाऱ्या रूग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि उपचारांसाठी पैसे पुरवेल. यामध्ये विशेषतः अशा लोकांचा समावेश होईल, जे आपत्कालीत परिस्थितीत येतील आणि ज्यांना चाचण्या / तपासण्या तसेच त्यांना लिहून दिलेल्या औषधांचा खर्च परवडत नसेल.

रुग्णांचा खर्च

आरवी एनकॉन विशेष करून अशा रुग्णांचा खर्च भरून देईल, ज्यांचा मुंबईतील कोणत्या ना कोणत्या रेल्वे स्थानकांवर अपघात झाला असेल. यामध्ये चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्निरोड आणि ग्रँटरोड यांसारख्या स्थानकांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत एकूण १२ वैद्यकीय चाचण्या आणि त्यांची औषधे ही देखील रुग्णांना सैफी हॉस्पिटलकडून सवलतीच्या दरात मिळतील व आरवी एनकॉन पात्र रूग्णांच्या वतीने त्याची भरपाई करून देईल. यामध्ये सीबीसी, ईएसआर, कोलेस्टेरॉल, ईसीजी आणि छातीचा एक्सरे इ. चा ही समावेश आहे.

दर्जेदार वैद्यकीय सेवा

आरवी एनकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्ही डी संघवी म्हणाले,“आरवी एनकॉनमध्ये आम्ही असे मानतो की, दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. पण ब-याचदा माहितीचा अभाव, मोठा खर्च आणि सुविधांचा अभाव या कारणांमुळे गरजू लोकांना अगदी आणीबाणीच्या वेळेतही मूलभूत हेल्थकेअर मिळत नाही. एका उदात्त उद्देशाने सैफी हॉस्पिटलसारख्या अत्यंत प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की, या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना फायदा होईल."




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा