पाच वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण

शेजारच्या मुलाचं अपहकण करुन लाखभर रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी सहा तासांत अटक करत मुलाची सुटका केली. अक्रम खान(21) असं या आरोपीचं नाव आहे.

पाच वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण
SHARES

कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्यामुळे शेजारच्या मुलाचं अपहकण करुन लाखभर रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी सहा तासांत अटक करत मुलाची सुटका केली. अक्रम खान(21) असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.


म्हणून रचला अपहरणाचा कट

साकीनाकाच्या सुलेमान पाड्यात शाकीरअली सुलेमान खान हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. साकीनाकाच्या एका कपड्याच्या कारखान्यात ते कामाला आहेत. तर अक्रम हा शाकिरअली सुलेमान यांच्या शेजारीच रहात असून त्याचे जनरल स्टोअर्सचं दुकान आहे. अक्रमने एका व्यक्तीकडून काही लाख रुपये उसने घेतले होत. मात्र त्याला ते वेळेवर देता न आल्याने देणेकरी वारंवार अक्रमच्या घरी फेऱ्या लावत असे. देणेकऱ्यांचे पैसे देण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय न उरल्यामुळे अक्रमने शेजारच्या 5 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या घरातल्यांजवळ खंडणी घेऊन पैसे भागवण्याचा कट रचला. 


असं केलं अपहरण

गुरुवारी सकाळी शाकीरअली नेहमीप्रमाणे कामावर निघून गेल्यानंतर घरी त्याचा मुलगा आणि आई दोघेच होते. शाकीरअली यांची पत्नी घरातील कामात व्यस्त असताना अंगणात खेळत असलेल्या मुलाला चॉकलेटचं आमिष दाखवून पळवून नेत दुकानात डांबून ठेवलं. त्यानंतर अक्रमने शाकीर यांना फोन करून खंडणीसाठी धमकावले. मुलाचं अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भेदरलेल्या शाकीर यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात मदतीसाठी धाव घेतली.


अक्रमला अटक

मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. पोलिसांनी अक्रमचा मोबाइल नंबरचा माग काढला असता तो फोन अक्रमचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी अक्रमला ताब्यात घेत, मुलाची सुटका केली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी अक्रमवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.


हेही वाचा -

नशेसाठी त्यांनी पतपेढी लुटली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा