नशेसाठी त्यांनी पतपेढी लुटली

मुलुंड परिसरातील सर्वोद्य सहकारी पतपेढीतील लॉकरची चोरी करून 14 लाखांची लूट करणाऱ्या दोन गर्दुल्यांना गुन्हे शाखा 7 च्या पोलिसांनी अटक केली आहे.

नशेसाठी त्यांनी पतपेढी लुटली
SHARES

मुलुंडमधील सर्वोदय सहकारी पतपेढीतील लॉकरची चोरी करून 14 लाखांची लूट करणाऱ्या दोन गर्दुल्यांना गुन्हे शाखा 7 च्या पोलिसांनी अटक केली आहे. सुफीयान अन्सारी (20) आणि मुबारक शेख (19) अशी या दोघांची नावं आहेत. नशेसाठी पैसे नसल्यानं या दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं.


अखेर तिजोरीच पळवली

मुलुंड परिसरातील सर्वोद्य सहकारी पतपेढी सर्वपरिचीत आहे. 5 ऑगस्ट रोजी पतपेढीतील सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे पतपेढी बंद करून निघून गेले. त्याच रात्री नशेसाठी पैसे नसल्यामुळे सुफीयान आणि मुबारक यांनी पतपेढी लुटण्याचा कट रचला. पतपेढीचे कुलूप तोडून त्यांनी पतपेढीत शोधाशोध सुरू केली असता त्यांच्या हाती काही लागलं नाही. त्यानंतर पतपेढीच्या आतल्या खोलीत असलेल्या लॉकरवर त्यांची नजर पडली. दरम्यान लॉकरची चावी शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरा, मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही. अखेर एका कप्प्यात कापडी पिशवीत बांधून ठेवलेले 289 रुपयांचे चिल्लर मिळाले. त्यानंतर दोघांनी काही किलो वजनाची ती तिजोरीच चोरून नेली.


मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार 

या तिजोरीत पतपेढीचे 14 लाख 38 हजार रुपये आणि 6 आरसी बुक होते. दुसऱ्या दिवशी पतपेढीचे मॅनेजर गिरीश साळवी यांनी नेहमीप्रमाणे पतपेढी उघडली असता त्यांना पतपेढीतील सामान अत्यावस्थ विखुरलेले निदर्शनास आले. त्याचबरोबर पतपेढीतील लॉकरही चोरीला गेल्याचं कळाल्यानंतर त्यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. कालांतराने हा गुन्हा गुन्हे शाखा 7 कडे सोपवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सुफीयान आणि मुबारक यांनी चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.


हेही वाचा -

पाच वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा