उड्डाणपुलाखाली अनधिकृत कार विक्री


उड्डाणपुलाखाली अनधिकृत कार विक्री
SHARES

देवनार - येथील ट्रॉम्बे उड्डाणपुलाखाली सध्या अनधिकृत कार विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. या उड्डाणपुलाखाली पूर्वी वाहनं उभी केली जात होती. सध्या पे अ‍ॅन्ड पार्क पद्धत बंद करण्यात आली आहे. तरीही एका विक्रेत्यानं महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत या उडडाणपुलाखालीच कार विक्रीचा हा व्यवसाय सुरू केलाय. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रॉम्बे वाहतूक पोलीस चौकीच्या पाठीमागेच ही अनधिकृत कार विक्री तेजीत चालली आहे. त्यामुळे हा या भागातल्या रहिवाशांत चर्चेचा विषय ठरलाय.

संबंधित विषय