परदेशी तरुणाला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

कुलाबाच्या तुलस रोडवरील गोकुळ बार अँड रेस्टॅरंटमध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५१ वर्षीय परदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. डॅमेना गेटराचेव्ह असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

परदेशी तरुणाला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक
SHARES

कुलाबाच्या तुलस रोडवरील गोकुळ बार अँड रेस्टॅरंटमध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ५१ वर्षीय परदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. डॅमेना गेटराचेव्ह असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  


पैसे देण्याचा प्रयत्न 

मूळचा इथोपियन नागरिक असलेला डॅमेना हा शनिवारी पहाटे कुलाबाच्या गोकुळ बारमध्ये त्याच्या मित्रासोबत बसला होता. त्यावेळी २१ वर्षीय पीडित तरुणी तिच्या नातेवाईकांसोबत जेवण्यासाठी आली होती.  पीडित तरुणी हात धुण्यासाठी बेसिंगजवळ जात असताना डॅमेना याने तिचा हात पकडत, तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतापलेल्या तरुणीने डॅमेनाच्या कानशिलात लगावली. या प्रकारानंतर हाॅटेलमधील कर्मचारी आणि तरुणीच्या कुटुंबियांनी डॅमेनाला चोप देत पोलिसांना बोलावले.

घटनास्थळी कुलाबा पोलिस आल्यानंतर डॅमेनाला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॅमेनावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. 



हेही वाचा -

बेनामी ६ कोटी रुपयांना अद्याप वाली नाही

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर मुंबईच्या सुरक्षेत वाढ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा