एमडी व चरससह परदेशी नागरीकाला अटक


एमडी व चरससह परदेशी नागरीकाला अटक
SHARES

 केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) नवी मुंबई येथे केलेल्या कारवाईत  सुमारे अर्धा किलो मेफेड्रॉन(एमडी) व ३८ ग्रॅम चरससह एका परदेशी नागरीकाला अटक केली. आरोपी खारघर येथे वास्तव्याला होता. तो मुंबई व परिसरातील ड्रग्स तस्करीतील प्रमुख वितरक असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली.

पॉल चिगबाटा ओनुओरोह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नायजेरीयन नागरीक आहे. खारघर येथील शिल्प व्हॅली रोडजवळ आरोपी ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती एनसीचे विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार तेथे सापळा रचण्यात आला होता. शुक्रवारी आरोपी तेथे आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्याच्याकडे ४७४ ग्रॅम एमडी व ३८ ग्रॅम चरस सापडले. आरोपी खारघर येथील साईहिरा पार्क येथे वास्तव्याला होता. शनिवारी त्याच्या घरी शोध मोहिम राबवून तेथून एमडीचा आणखी साठा जप्त करण्यात आला आहे. कोकेन, इक्स्टसी, एमडी व चरस यांच्या वितरणातील मुंबई व परिसरातील तो प्रमुख वितरक असल्याचे एनसीबीकडून सागण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपीच्या संपर्कातील काही व्यक्ती एनसीबीच्या रडारवर आले आहेत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा