परदेशी महिलेला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक


परदेशी महिलेला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी महिलेला हिराँईन ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी हवाई गुप्तचर विभागाने अटक केली आहे. जेन नालो मन्शी उर्फ म्बाबाझी ओलिव्हर जोसलिन असे या महिलेचे नाव आहे. गुप्तचर विभागाने महिलेकडून जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत अडीच कोटी इतकी आहे.

हेही वाचाः- राज्यभरात हुडहुडी! गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर

मूळची युगांडाची रहिवाशी असलेली जेन ही मुंबईच्या नालासोपारा परिसरात राहते. त्या परिसरातून ती तस्करांना ड्रग्जची निर्यात करते. ती चेकावू मेका नावाच्या एका ड्रग्ज तस्कराच्या संपर्कात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी तिला चेकावू ने हे ड्रग्ज दिल्याची कबूली तिने गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर दिली आहे. गुप्तचर विभागाने पकडलेले ड्र्गज ती दिल्लीला घेऊन जात होती. त्या ठिकाणी चेकावूच्या एका मित्राला देऊन ती मुंबईत पून्हा परतणार होती.या कामासाठी तिला विमानाचे तिकिट आणि कमिशनही दिले होते. शनिवारी जेन ही विमानतळावर आली असताना. गुप्तचर विभागाच्या चौकशीत तिचा पर्दाफाश झाला.जेन ही टूरिस्ट व्हिजावर मुंबईत आली असून तिला सहकार्य करणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांचा शोध आता सुरू केला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा