Advertisement

अरविंद इनामदार फाऊंडेशनचे 'पोलीस जीवन गौरव' पुरस्कार जाहीर

पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी करत आपला ठसा उमठवणाऱ्यांना अरविंद इनामदार फाऊंडेशनतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचं फाऊंडेशनचं हे तिसरं वर्ष अाहे.

अरविंद इनामदार फाऊंडेशनचे 'पोलीस जीवन गौरव' पुरस्कार जाहीर
SHARES
Advertisement

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा 'पोलीस जीवन गौरव' पुरस्कार गुरूवारी जाहीर करण्यात अाला. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार हा राज्याचे माजी पोलीस महासंचालक वसंत केशवराव सराफ, सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त माधव प्रधान, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक शामराव राऊत यांना देण्यात येणार अाहे.  २६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथील स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. 


नारायण मूर्तींची उपस्थिती

पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी करत आपला ठसा उमठवणाऱ्यांना अरविंद इनामदार फाऊंडेशनतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचं फाऊंडेशनचं हे तिसरं वर्ष अाहे. २६ डिसेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा शिवाजी पार्कच्या स्वांतत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडणार अाहे. या सोहळ्याला इन्फोसिसचे संस्थापक अध्यश्र नारायण मूर्ती यांची विशेष उपस्थिती असणार अाहे.  त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मान्यवरांना दिला जाणार आहे. 


प्रामाणिक पोलिसांचा गौरव

सेवेत असताना प्रामाणिकपणे, सचोटीने काम करणाऱ्या पोलिसांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पोलिसांच्या उत्कृष्ठ कामाचे कधीही कौतुक होत नाही. पोलिसांना त्यांच्या कामात प्रोत्साहन मिळावे, यासाठी पोलिस जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी सांगितलं.हेही वाचा - 

सोहराबुद्दीन चकमक: सर्वच्या सर्व २२ आरोपी दोषमुक्त!

यूट्यूब स्टार दानिश झहेनचा कार अपघातात मृत्यू
संबंधित विषय
Advertisement