यूट्यूब स्टार दानिश झहेनचा कार अपघातात मृत्यू

वाशी नाका येथे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याची कार रस्त्याशेजारी असलेल्या दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दानिशचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

SHARE

यूट्यूबवरील स्टार दानिश झहेन (२१) चा बुधवारी रात्री १ वाजता वाशी येथे कार अपघातात मृत्यू झाला. वेगात गाडी चालवत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. या अपघातात त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली. 


वेगवान ड्रायव्हिंगसाठी  प्रसिद्ध 

एमटीव्हीमधील एका सिरियलमध्ये काम करणाऱ्या दानिशने लहानवयातच तरुणांवर भुरळ पाडली होती. यूट्यूबवरून त्याने सुरू केलेल्या त्याचा प्रवासाने अल्पावधीतच तो तरुणांचा चाहता बनला होता. गुरूवारी रात्री दानिश कुर्लाहून वाशीला एका नातेवाईकांच्या लग्नासाठी जाण्यासाठी रात्री १ च्या सुमारास निघाला होता. दानिश पूर्वीपासूनच वेगात गाडी चालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गुरूवारी देखील तो वेगात गाडी चालवत वाशीच्या दिशेने जात होता.


गाडीचा चेंदामेंदा 

वाशी नाका येथे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याची कार रस्त्याशेजारी असलेल्या दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दानिशचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.  या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दानिशचा मृतदेह जवळील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.


अाधीही भीषण अपघात

या पूर्वीही दानिशचा असाच भीषण अपघात झाला होता. त्यावेळी दानिश थोडक्यात बचावला होता. मात्र. त्याचा दानिशवर काहीच फरक पडला नाही. अखेर गुरूवारी त्याच्यावर काळाने घाला घातला. दानिशच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा - 

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी १० जणांना सीबीआयनं घेतलं ताब्यात

चोरीच्या दुचाकी ओएलएक्सवर विकणारा अटकेत
संबंधित विषय
ताज्या बातम्या