पीएनबी घोटाळ्याप्रकरणी १० जणांना सीबीआयनं घेतलं ताब्यात

अटक करण्यात आलेल्या या १० जणांविरोधात खोटे कागदपत्र दाखवल्याचा आरोप दाखल करण्यात आला असून सीबीआयनं या आरोपींना कोर्टात दाखल केलं. याप्रकरणी कोर्टानं या १० आरोपींना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी १० जणांना सीबीआयनं घेतलं ताब्यात
SHARES

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) १० जणांना अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांना कर्ज मिळवून देण्यात मदत करणाऱ्या पंजाब नॅशनल बॅँकेच्या ८ अधिकाऱ्यांसह १० जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेनं (सीबीआय) मंगळवारी अटक केली.

खोटे कागदपत्र

अटक करण्यात आलेल्या या १० जणांविरोधात खोटे कागदपत्र दाखवल्याचा आरोप दाखल करण्यात आला असून सीबीआयनं या आरोपींना कोर्टात दाखल केलं. याप्रकरणी कोर्टानं या १० आरोपींना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

हे आहेत आरोपी

अमर जाधव, सागर सावंत, मुख्य व्यवस्थापक बिच्चू तिवारी, व्यवस्थापक यशवंत जोशी, शाखा प्रमुख संजय प्रसाद, अधिकारी प्रफुल्ल सावंत, व मुख्य अंतर्गत लेखापाल मोहिंदर शर्मा, ईश्वरदास अगरवाल व आदित्य रसीवसा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना २१ डिसेंबरपर्यत सीबीआयची कोठडी मिळाली आहे.

याप्रकरणी सीबीआयसोबत महाराष्ट्र सरकारनेही नीरव मोदीला पकडण्यासाठी तयारी दर्शवली आहे. तसंच, याआधी सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नीरव मोदीविरोधात मनी लॉड्रिंग कायद्यांर्तंगत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार

नीरव मोदीची ६३७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा