मैत्रिणीला निमंत्रण अंतिम संस्काराचं

 Girgaon
मैत्रिणीला निमंत्रण अंतिम संस्काराचं

खेरवाडी - माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. राकेश वाघ असं या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याने खेरवाडी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडला अंतिमसंस्काराला बोलावण्याचे त्याने सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे.

राकेश वाघ हा खेरवाडी परिसरातील न्यानेश्वर नगर परिसरात राहत होता. बुधवारी रात्री त्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली. तपासणी केली असता राकेशने सुसाईड केल्याचं समोर आले. आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसून जीवनाला कंटाळल्याने आत्महत्या केल्याचं त्याने सुसाईड नोट मध्ये लिहले आहे.

पोलीस तपासात राकेश कर्जबाजारी होता, रूमचे भाडे देखील त्याने काही महिन्यांपासून भरलं नव्हतं, दारूच्या नशेत त्याने आत्महत्या केल्याचं खेरवाडी पोलिसांनी म्हटलं आहे

Loading Comments