गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंचाला अटक

या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंचाला अटक
The clip showed the man pulling the officer, Sindhu Sanap, 24-year-old, by her hair and dragging through the field while Pratibha locked the ranger's feet. (Video Screenshot)
SHARES

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील (Satara district) एका गावात माजी सरपंचाला महिला वनरक्षकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Video viral in Social media) झाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे की, गावचा माजी सरपंच असलेला व्यक्ती एका महिला वनरक्षकाला बेदम मारहाण (lady forest guard beaten) करत आहे.

या कृत्यात या माजी सरपंचाला त्याच्या पत्नीनंही मदत केली. या व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आणि या सरपंचावर टीकेचा भडीमार सुरू झाला. या प्रकरणात आरोपीला आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, आरोपीला आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित वनरक्षक महिला ही तीन महिन्यांची गर्भवती आहे. गर्भवती महिलेच्या पोटातही आरोपीनं लाथा मारल्या असल्याचं समोर आलं आहे. तसंच त्या महिलेच्या डोक्यात दगड देखील मारला. या हल्ल्यात महिला वनरक्षक जखमी झाल्या.

सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावात ही घटना घडली आहे. माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक आणि त्यांचे पती यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेनं वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा

मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पवई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांची आत्महत्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा