लोणावळ्याजवळील अपघातात मुंबईचे ४ ठार

 Pali Hill
लोणावळ्याजवळील अपघातात मुंबईचे ४ ठार

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रे्सवेवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सेंट्रो कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. यामध्ये मुंबईचे 4 जण जागीच ठार झाले. लोणावळा येथील वलवण महाविद्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये मुंबई पोलीसचे कर्मचारी राजेंद्र  चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वनीता चव्हाण, शंकर वेणगुळे आणि त्यांच्या पत्नी पुजा वेणगुळे यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबईचे रहिवासी होते. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या सेंट्रो  चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  हा अपघात घडला. सेंट्रो गाडी कंटेनरच्या ४ फूट खाली घुसल्याने आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. 

Loading Comments