पहा..कशी लुटली धारावीतली एटीएम कॅश व्हॅन!


SHARES

धारावी - मुंबईच्या धारावी परिसरातून भर दुपारी एटीएम कॅश व्हॅन लुटण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जवळपास दीड कोटींची रोकड चोरांनी पळवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, धारावी पोलीस तसेच गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश लोड करण्यासाठी दुपारच्या सुमारास कॅश व्हॅन धारावीच्या संत रोहिदास मार्गावर आली. रस्त्याच्या पलीकडे त्यांनी गाडी लावली आणि त्यानंतर पैशाची पेटी घेऊन संत रोहिदास मार्गावर आले. त्यावेळी दबा धरून बसलेले चोर व्हॅनजवळ आले आणि त्यांनी पैशांनी भरलेली पेटी घेऊन तिथून पोबारा केला. विशेष म्हणजे जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कॅशची पेटी घेऊन लगबगीने जाणारे हे चोर अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. असं सांगण्यात येतंय की या चोरांनी टॅक्सी पकडून पोबारा केला. ज्या प्रकारे गुन्हा घडला त्यावरून या चोरीत बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा