उदानी हत्याकांडातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हत्येच्यावेळी सचिन जरी उपस्थित नसला तरी फोन वरून तो इतर आरोपींना मार्गदर्शन करत होता. उदानींची हत्या करून दिनेश मुरूड येथे महिला आरोपी निखिताला घेऊन गेला. या हत्याकांडासाठी सर्वांनीच नवीन सीमकार्ड घेतले होते. विशेष म्हणजे या हत्याकांडानंतर सर्वांनी आपले मोबाइल सिमकार्ड आणि अंगावरील कपडेही जाळत पुरावे नष्ठ केले.

उदानी हत्याकांडातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
SHARES

घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी सचिन पवारसह दिनेश पवार, सिद्देश पाटील, महेश भोईर या चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उदानीचे सचिनच्या मैत्रिणीवर असलेल्या वाईट नजरेमुळे ही हत्या केल्याचे आता सिद्ध झाले आहेत.


घटना काय?

पंतनगर परिसरत राहणारे राजेश्वर किशोरलाल उदानी (५७) यांचं घाटकोपर परिसरात सोने विक्रीचं दुकान आहे. उदानी २८ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त घराबाहेर जात असल्याचं सांगून घराबाहेर पडले. मात्र दुसरा दिवस उजाडला तरी ते घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पंतनगर पोलिसांत ते बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान राजेश्वर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पनवेल  येथील नेहरे गावाजवळ आढळून आला.


फोन करून त्रास

या प्रकरणी पोलिसांनी ३ डिसेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी २५ जणांची चौकशी केली. त्यानंतर राजेश्वर यांच्या मोबाईल रेकॉर्डनुसार मेहता यांचा माजी स्वीय सचिव सचिन पवारसह टप्याटप्याने सात जणांना अटक केली. पुढे न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस तपासात आरोपींनी सचिन यांच्या मैत्रिणीवर उदानी यांची वाईट नजर होती. समजावून देखील उदानी तिला फोन करून त्रास देत होते. त्यावरून सचिनने सहआरोपींच्या मदतीने त्यांची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

  

नंबरप्लेटमुळे जाळ्यात

हत्येच्यावेळी सचिन जरी उपस्थित नसला तरी फोन वरून तो इतर आरोपींना मार्गदर्शन करत होता. उदानींची हत्या करून दिनेश मुरूड येथे महिला आरोपी निखिताला घेऊन गेला. या हत्याकांडासाठी सर्वांनीच नवीन सीमकार्ड घेतले होते. विशेष म्हणजे या हत्याकांडानंतर सर्वांनी आपले मोबाइल सिमकार्ड आणि अंगावरील कपडेही जाळत पुरावे नष्ठ केले. मात्र, या सर्वांनी उदानी यांना मारण्यासाठी जी गाडी वापरली ती गाडी दोन दिवसांपूर्वी आरोपींनी एका मॅकेनिककडे सर्व्हिसिंगसाठी नेली होती. त्या ठिकाणी मॅकेनिकच्या न कळत त्यांनी दुसऱ्याा गाडीची नंबरप्लेट स्वत:च्या गाडीला लावून स्वत:ची नंबरप्लेट तेथेच सोडून गेले. त्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात हे सर्व सहज अडकले. 


अारोपी गुवाहाटीला 

हत्येनंतर मुरूडवरून दिनेश व सचिन हे दोघेही दोन दिवस गुवाहाटीला गेले होते. ते त्या ठिकाणी का गेले होते याबाबतचा तपास करणे बाकी आहे. तसंच पोलिसांनी तपासाअंती सचिनची खासगी कार ताब्यात घेत न्यायालयाकडे तपासासाठी पोलिस कोठडी मागितली होती. मात्र सर्व गोष्टी पोलिसांना देण्यात आल्या असून सरकारी वकील वेळकाढू प्रक्रिया करत असल्याचे आरोपींच्या वकिलांकडून निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.हेही वाचा - 

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना १० वर्षाची शिक्षा

गुंड टी. पी. राजाच्या हत्येप्रकरणी आरोपीला राजस्थानातून अटक
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा