गुंड टी. पी. राजाच्या हत्येप्रकरणी आरोपीला राजस्थानातून अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. तपासात अमजद राजस्थानमध्ये असल्याची पक्की खबर मिळताच वडाळा टी. टी. पोलिसांच्या एका पथकाने तिथं जाऊन अमजदला अटक केली.

गुंड टी. पी. राजाच्या हत्येप्रकरणी आरोपीला राजस्थानातून अटक
SHARES

कुख्यात गुंड डी. के. रावचा हस्तक टी. पी. राजाची काही दिवसांपूर्वी दोघांनी त्याच्या घरात घुसून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी वडाळा पोलिसांनी एकाला राजस्थानातून अटक केली आहे. अमजद मकबूल खान (३१) असं या आरोपीचं नाव आहे. त्याचा दुसरा साथीदार इम्रान याचा पोलिस शोध घेत आहे.


घरात घुसून हत्या

मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (४०) सायन कोळीवाडा येथील म्हाडा कॉलनीतील ‘सूर्यनिवास’ मध्ये तिसऱ्या मजल्यावर रहात होता. ७ डिसेंबरला भरदुपारी अमझत आणि इम्रान यांनी त्याच्या घरात घुसून हत्या केली होती. हत्या झाली त्यावेळी राजा घरी एकटाच होता.


राजस्थानात जाऊन अटक

या हत्येनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. गोळीच्या आवाजाने राजाच्या खोलीकडे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. त्याच दरम्यान रक्ताने माखलेल्या अवस्थेत दोन्ही आरोपी पळत सुटले. आरोपी ज्या दुचाकीने आले होते, ती दुचाकी सुरू न झाल्यामुळे आरोपी दुचाकी तिथंच सोडून पळून गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. तपासात अमजद राजस्थानमध्ये असल्याची पक्की खबर मिळताच वडाळा टी. टी. पोलिसांच्या एका पथकाने तिथं जाऊन अमजदला अटक केली.हेही वाचा-

गुप्तांगात अंमलीपदार्थ लपवून आणणाऱ्या महिलेची निर्दोष मुक्तता

वांद्र्यात बॅग हिसकावणाऱ्या ३ भुरट्या चोरांना अटकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा