गुप्तांगात अंमलीपदार्थ लपवून आणणाऱ्या महिलेची निर्दोष मुक्तता

अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील ३ वर्षांपूर्वी या महिलेली अंमली पदार्थासह अटक केली होत. तिने हे अंमली पदार्थ गुप्तांगात लपवून आणले होते. अटकेनंतर तपास अधिकाऱ्यांनी कायद्याचं पालन न करता तपास केला. त्यावर महिलेचे वकील तारक सय्यद यांचा हा युक्तीवाद न्यायालयाने स्वीकारला.

SHARE

तीन वर्षांपूर्वी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ब्राझीलच्या ४० वर्षीय महिलेला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. कार्ला इन्स पिंटो असं या महिला आरोपीचं नाव आहे. तिच्याजवळून पोलिसांनी ४८० ग्रॅम कोकेनचे ८ कॅप्सूल हस्तगत केले होते. मात्र सबळ पुरावे असतानाही तपास अधिकाऱ्यांनी नियमांचं पालन न करत केलेल्या कारवाईमुळे या महिलेला निर्दोष सोडण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली आहे.


अधिकार डावलला

अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील ३ वर्षांपूर्वी या महिलेली अंमली पदार्थासह अटक केली होत. तिने हे अंमली पदार्थ गुप्तांगात लपवून आणले होते. अटकेनंतर तपास अधिकाऱ्यांनी कायद्याचं पालन न करता तपास केला. त्यावर महिलेचे वकील तारक सय्यद यांचा हा युक्तीवाद न्यायालयाने स्वीकारला. कलम ५० नुसार जवळ असलेल्या कुठल्याही मॅजिस्ट्रेट किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याच्या समक्ष तपासणीस उभं राहण्याचा अधिकार आरोपीला आहे. पण तपास पथकाने आरोपीचा हा अधिकार डावलला, असं सय्यद म्हणाले.


काय म्हणालं न्यायालय?

स्पॅनीश बोलणाऱ्या आरोपी महिलेला इंग्रजी कळत नसतानाही तिला तपासणीच्या अधिकारांची माहिती इंग्रजीत देण्यात आली. तसंच महिलेची जबानी घेतल्यानंतर तिला दुभाषी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे तपासादरम्यान कलम ५० मधील नियमांचं पालन न झाल्याचं यातून स्पष्ट होतं. म्हणूनच महिलेकडून कुठल्याही प्रकारची वसुली अवैध आहे. शिवाय आरोपी महिलेविरोधात सबळ पुरावेही सादर करण्यात आले नाहीत. यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याचं नमूद करत न्यायालयाने आरोपी महिलेची निर्दोष मुक्तता केली.हेही वाचा-

दाऊदला लागोपाठ दोन झटके, भारताला मिळणार पुतण्याचा ताबा

विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या महिलेला अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या