दाऊदला लागोपाठ दोन झटके, भारताला मिळणार पुतण्याचा ताबा

सोहेल हा दाऊदचा भाऊ नूर याचा मुलगा आहे. त्याला २०१६ मध्ये अमेरिकेत हत्यारांची विक्री करताना अटक झाली होती. अंमली पदार्थांच्या बदल्यात तो अमेरिकेत हत्यारांची विक्री करत होता. प्रत्यार्पण करारांतर्गत भारताने त्याचा ताबा मिळवण्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण केली आहे.

SHARE

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमला गेल्या आठवड्यात एकापाठोपाठ दोन झटके बसले आहेत. शुक्रवारी दाऊदचा सर्वात जवळचा सहकारी छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेख याला अबूधाबीत अटक करण्यात आली. तर दुसरीकडे दाऊदचा पुतण्या सोहल शेख याला अमेरिकेतून भारतात आणण्याची तयारी भारतीय तपास यंत्रणांनी सुरू केली आहे.

कोण आहे सोहेल?

सोहेल हा दाऊदचा भाऊ नूर याचा मुलगा आहे. त्याला २०१६ मध्ये अमेरिकेत हत्यारांची विक्री करताना अटक झाली होती. अंमली पदार्थांच्या बदल्यात तो अमेरिकेत हत्यारांची विक्री करत होता. प्रत्यार्पण करारांतर्गत भारताने त्याचा ताबा मिळवण्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण केली आहे.

ताबा मिळवण्याचा प्रयत्न

अन्वर याला देखील अबूधाबीतून ताब्यात घेण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा अटोकाट प्रयत्न करत आहेत. अन्वर याच्या अटकेवेळी त्याच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट मिळाला होता. त्यामुळे पाकिस्तान देखील अन्वरची कस्टडी मागत आहे. अन्वर याच्या विरोधात आधीच रेड काॅर्नर नोटीस काढण्यात आली होती. अन्वर भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी आयएसआयला मदत करत होता.

छोटा शकील १९९३ च्या मुंबई बाॅम्ब हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. बाॅम्बस्फोट झाल्यानंतर तो दाऊद आणि इतर साथीदारांसोबत भारताबाहेर पळून गेला होता.हेही वाचा-

डी कंपनी पुन्हा हादरली, छोटा शकीलचा भाऊ अन्वरला अबूधाबीत अटक

भायखळ्यात अंमली पदार्थ तस्करांचा पोलिसांवर गोळीबारसंबंधित विषय
ताज्या बातम्या