भायखळ्यात अंमली पदार्थ तस्करांचा पोलिसांवर गोळीबार

पोलिस आणि तस्करांमध्ये चकमक सुरू असताना. ७ ते ८ तस्करांनी रेल्वे यार्डाच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी पोलिस त्यांच्या मागावर गेले असता, तस्करांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने चाैघांना पाठलाग करून अटक केली. या चकमकीत ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

SHARE

भायखळ्यातील खडा पारसी भागातील अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या भायखळा पोलिसांवर नायजेरियन तस्करांनी शुक्रवारी सायंकाळी गोळीबार केला. या गोळीबाराला प्रतिउत्तर म्हणून पोलिसांनी २ राऊंड फायर करत ४ जणांना ताब्यात घेतलं. या तस्करांनी या पूर्वी देखील पोलिसांवर दगडांनी हल्ला चढवत त्यांना जखमी केलं होतं.

नायजेरिय तस्करांचं जाळं

भायखळाच्या रेल्वे वसाहतीजवळील बरकले कंम्पाऊडजवळ दररोज मोठ्या प्रमाणात नायजेरियन अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येत असतात. त्यांच्यावर पोलिसांनी अनेकदा कारवाया देखील केल्या. परंतु नायजेरियन तस्कर काही वेळापुरते तिथून नाहीसे होतात आणि पुन्हा तिथं येतात.

अचानक फायरिंग

त्यानुसार शुक्रवारी भायखळा पोलिस आणि अंमली पदार्थ विभागाचे अधिकारी संयुक्तरित्या कारवाई करण्यासाठी या भागात गेले. त्यावेळी संशयीत तस्करांपैकी एकाने पोलिसांवर अचानक एक गोळी फायर केली. या फायरिंगनंतर पोलिसांनी देखील तस्करांच्या दिशेने २ राऊंड फायर करत, तिघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं.

पोलिसांवर दगडफेक

पोलिस आणि तस्करांमध्ये चकमक सुरू असताना. ७ ते ८ तस्करांनी रेल्वे यार्डाच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी पोलिस त्यांच्या मागावर गेले असता, तस्करांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने चाैघांना पाठलाग करून अटक केली. या चकमकीत ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिताफीने अटक

या कारवाईत पोलिसांनी क्रीस्ट डायला (२५), डॅन ओकोफर ओकोनोको (२५), चुकूसचुकूवोनी (२७), चूकूवायजीक गॅडफ्री अॅनीअमवू (४१), ज्यूल इडायघे (४०), नॅन्यामडी आॅगस्टीन ओकोरो (३८), जाॅन नोनसो (२२) अशा ७ जणांना अटक केली आहे. या सर्वांवर भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा-

३३३ कोटींचा जीएसटी चुकवणाऱ्या व्यावसायिकाला अटक

प्रतिबंधित औषधं विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूकसंबंधित विषय
ताज्या बातम्या