३३३ कोटींचा जीएसटी चुकवणाऱ्या व्यावसायिकाला अटक

मध्य प्रदेशातील नॅशनल स्टील अँड अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने प्रत्येक खरेदी आणि विक्रीमागे सरकारला मोठ्या प्रमाणात जीएसटी भरावा लागत होता. त्यामुळेच त्यांनी मुंबईतील मशीद बंदर व भांडुप परिसरात कागदोपत्री बोगस कंपन्या उभ्या करून व्यवहार केल्याचं दाखवलं. या व्यवहारातून आरोपीने ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडवला.

३३३ कोटींचा जीएसटी चुकवणाऱ्या व्यावसायिकाला अटक
SHARES

बोगस कंपन्यांच्या माध्यमातून केवळ कागदावर खरेदी विक्रीचा व्यवहार दाखवून सरकारला ३३३ कोटींचा चुना लावणाऱ्या मध्य प्रदेशातील एका व्यवसायिकाला जीएसटी विभागाने अटक केली आहे. नागालिंगम गोली असं या व्यवसायिकाचं नाव आहे. व्यवहारात दाखवण्यात आलेल्या मुंबईतील बोगस कंपन्या नोंदणीकृत पत्त्यावर नसल्याचं तपासात पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील नॅशनल स्टील अँड अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाने प्रत्येक खरेदी आणि विक्रीमागे सरकारला मोठ्या प्रमाणात जीएसटी भरावा लागत होता. त्यामुळेच त्यांनी मुंबईतील मशीद बंदर व भांडुप परिसरात कागदोपत्री बोगस कंपन्या उभ्या करून व्यवहार केल्याचं दाखवलं. या व्यवहारातून आरोपीने ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडवला.

बोगस कंपन्या

याबाबतची माहिती जीएसटी विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाती तपास सुरू केला. यांत तथ्य आढळल्यानंतर जीएसटी विभागाने गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशातील नॅशनल स्टील अँड अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक नागालिंगम गोली याला अटक केली. व्यवहारात दाखवण्यात आलेल्या मुंबईतील बोगस कंपन्या नोंदणीकृत पत्त्यावर नसल्याचंही उघड झालं आहे.

'अशी' केली फसवणूक

जुलै २०१७ ते ऑगस्ट २०१८ या काळात गोली यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील नॅशनल स्टील अँड अॅग्रो इंडस्ट्रीजचं नोंदणीकृत कार्यालय आणि मशीद बंदर येथील विकसित इंजिनिअरिंग व भांडुप येथील मितेश ट्रेडिंग प्रा.लि. यांच्यात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं दाखवलं. या प्रकरणी सखोल चौकशी केली असता, तिन्ही कंपन्यांमध्ये दाखवण्यात आलेल्या बोगस व्यवहारांमुळे केंद्र सरकारला प्रत्येकी १११ कोटी असा ३३३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

हेही वाचा-

पॅरोलवरील आरोपीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हिरे व्यापारी हत्याकांडात सातव्या आरोपीला अटक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा