हिरे व्यापारी हत्याकांडात सातव्या आरोपीला अटक


हिरे व्यापारी हत्याकांडात सातव्या आरोपीला अटक
SHARES

घाटकोपर येथील व्यावसायिक राजेश्‍वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी बुधवारी आणखी एका आरोपीला अटक केली. सिद्धेश पाटील असं या आरोपीचे नाव आहे. या कारवाईनंतर अटक आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.


हनी ट्रॅपचाही वापर

हत्येतील मुख्य अारोपी सचिन पवार याने  उदानी यांना काही दिवसांपूर्वी आर्थिक मदत केली होती. मात्र, व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे उदानी पवारला पैसे देऊ शकत नव्हते.  दोघांमध्ये या कारणावरून वाद होत असल्याने उदानी यांना अडकवण्यासाठी हनी ट्रॅपचाही वापर केला. त्यासाठी सचिनने शाहिस्ताच्या मदतीने झाराला गाडीत पाठवले होते. झारासोबतचे अश्लील फोटो काढून सचिन उदानीकडून पैसे उकळणार होता. मात्र, सचिनचा प्रयत्न फसला.


संगनमताने काटा 

२८नोव्हेंबरला दिनेश पवार हा गाडीतून उदानी यांना घेण्यासाठी त्यांच्या घराजवळ आला होता. त्यावेळी गाडीत झारा देखील होती. मात्र, हनी ट्रॅप फसल्यानंतर सचिन, दिनेश आणि प्रणीतने संगनमताने उदानींचा काटा काढला. उदानीला मारहाण करणाऱ्यांमध्ये महेश आणि सिद्धेशचा सहभाग होता. तपासात ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी तिघांना आणि बुधवारी सिद्धेशला अटक केली. हेही वाचा - 

हत्यारांच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक

लोकशाहीविरूद्ध लढण्याचा धडा देणारी वेबसाईट ब्लाॅक
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा