SHARE

मेघवाडी परिसरात हत्याराच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. राजू हरिराम तिवारी, जगदीश राजाराम जाधव अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चार देशी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.


सापळा रचून ताब्यात 

जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरातील शिवाजीनगर परिसरात दोन जण हत्यारांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मेघवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजदत्त कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळून पोलिसांनी आठ जिवंत काडतूसे आणि चार देशी कट्टे हस्तगत केले.  या दोघांनी ही पररराज्यातून ही हत्यारे विक्रीसाठी मुंबईत आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दोघेही मूळचे राहणारे ठाण्याचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा - 

लोकशाहीविरूद्ध लढण्याचा धडा देणारी वेबसाईट ब्लाॅक

गोवंडीच्या बाल सुधारगृहात अल्पवयीन मुलाची आत्महत्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या