गोवंडीच्या बाल सुधारगृहात अल्पवयीन मुलाची आत्महत्या

मूळचा पुण्यातील असलेल्या राहुलची घरची परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे त्याच्या आईने त्याला गोवंडीतील महापालिकेच्या शाळेत शिकण्यासाठी दाखल केलं होतं. त्याच्या राहण्याची व्यवस्था शाळेजवळच्या बालगृहात करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून तो नैराश्येत होता. त्यातूनच त्याने सोमवारी गळफास लावून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

SHARE

गोवंडीच्या बाल कल्याण नगरी येथील बाल सदनात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. राहुल टमगे असं या मृत मुलाचं नाव आहे. या मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून याप्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नैराश्येतून आत्महत्या

मूळचा पुण्यातील असलेल्या राहुलची घरची परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे त्याच्या आईने त्याला गोवंडीतील महापालिकेच्या शाळेत शिकण्यासाठी दाखल केलं होतं. त्याच्या राहण्याची व्यवस्था शाळेजवळच्या बालगृहात करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून तो नैराश्येत होता. त्यातूनच त्याने सोमवारी गळफास लावून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

अपमृत्यूची नोंद

नियमीत राऊंडच्या वेळी सुधारगृहातील वाॅर्डनने राहुलने आत्महत्या केल्याचं पाहिल्यावर त्यांनी त्वरीत पोलिसांना बोलावलं. या प्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्याच आली असून त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.हेही वाचा-

आर्थररोड कारागृहातील कसाबची जागा मल्यासाठी रिकामी

हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी आणखी तिघांना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या