आर्थररोड कारागृहातील कसाबची बॅरेक मल्ल्यासाठी रिकामी

आर्थररो़डच्या हाय सिक्युरिटी तुरूंगामध्ये मल्ल्याला ठेवण्यात येणार आहे. मल्ल्याला ठेवण्यात येणाऱ्या बॅरेकमध्ये या आधी २६/११ तील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. या बॅरेकला लागूनच कैद्यांसाठी वैद्यकीय सेवा केंद्र आहे. शिवाय त्याला इतर आरोपींचे बॅरेक जोडलेले नाहीत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

आर्थररोड कारागृहातील कसाबची बॅरेक मल्ल्यासाठी रिकामी
SHARES

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून भारताबाहेर पळालेला तथाकथित मद्यसम्राट विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी भारत आता फक्त दोन पावलं दूर आहे. मल्ल्याला भारतात आणल्यास त्याची रवानगी थेट मुंबईतील आर्थररोड कारागृहात केली जाणार आहे. त्यासाठी कारागृहात विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयने लंडन न्यायालयात मल्ल्याविरोधात एकत्रितपणे खटला दाखल केला होता. दोघांनी ही आपली बाजू भक्कमपणे लंडनच्या न्यायालयासमोर मांडल्यामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडन न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील तयारीला वेग आला आहे.


कुठं ठेवणार?

आर्थररो़डच्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये मल्ल्याला ठेवण्यात येणार आहे. मल्ल्याला ठेवण्यात येणाऱ्या बॅरेकमध्ये या आधी २६/११ तील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. या बॅरेकला लागूनच कैद्यांसाठी वैद्यकीय सेवा केंद्र आहे. शिवाय त्याला इतर आरोपींचे बॅरेक जोडलेले नाहीत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. या बॅरेकवर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी बॅरेकबाहेर शस्त्रधारी शिपाई तैनात करण्यात येणार आहे.


न्यायालय समाधानी

विजय मल्ल्याने भारतातील कारागृह माझ्यासाठी सुरक्षित नसल्याचे ब्रिटनमधील वेस्टमिनिस्टर मेजिस्ट्रेट कोर्टात सांगितलं होतं. त्यावेळी न्यायालयाने मल्ल्याला ज्या तुरूंगात ठेवण्यात येईल. त्या जागेचं व्हिडिओ शुटींग करून माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या मदतीने कारागृहाची पाहणी करून तसा अहवाल पाठवल्यानंतर मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.


फरार मल्ल्याची हेराफेरी

  • किंगफिशर एअरलाइन्सवर ३१ जानेवारी २०१४ पर्यंत ६,९६३ कोटी रुपयांचे कर्ज
  • त्यात व्याजाची भर पडून मल्ल्या प्रवर्तक असलेल्या कंपनीच्या डोक्यावर ९००० कोटींहून अधिक रुपयांचं कर्ज
  • स्टेट बँक आॅफ इंडियासहित एकूण १७ बँकांकडून कर्ज
  • किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये बंद, तर २०१४ मध्ये एअरलाइन्सचा परवाना रद्द
  • मार्च २०१६ मध्ये मल्ल्याचा लंडनमध्ये पळ
  • प्रिव्हेंशन आॅफ मनी लाॅड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत गुन्ह्याची नोंद
  • जून २०१६ मध्ये 'ईडी'च्या मागणीनुसार मुंबईतील विशेष न्यायालयाकडून फरार घोषित
  • दीड वर्षांहून अधिक काळ लंडनमध्ये वास्तव्य
  • मुंबई, बंगळुरूतील १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्तहेही वाचा-

मुद्दल देईल, पण व्याज देणार नाही, विजय मल्ल्याची कर्ज फेडण्याची तयारी

विजय मल्ल्या प्रत्यार्पण: सीबीआयनं लंडनला पाठवला आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा