मुद्दल देईल, पण व्याज देणार नाही, विजय मल्ल्याची कर्ज फेडण्याची तयारी

किंगफिशर एक शानदार एअरलाइन्स होती. विमानाचं इंधन महागल्याचा किंगफिशरला फटका बसला. १४० प्रति बॅरल अशा महागड्या इंधनाचा किंगफिशरला सामना करावा लागला. यामुळे एअरलाइन्सचा तोटा वाढत गेला. बँकांकडून घेतलेलं कर्ज नुकसान भरून काढण्यातच गेलं. मी बँकांचं १०० टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असं मल्ल्या म्हणाला.

SHARE

भारतीय बँकांचं ९,५०० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवून परदेशात पळ काढणारा तथाकथिक मद्यसम्राट विजय मल्ल्याने हे कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. अर्थात काही अटी-शर्थींवर. बुधवारी सकाळी यासंदर्भात ट्विट करताना मल्ल्या म्हणाला की मी भारतीय बँकांकडून घेतलेलं सर्व कर्ज फेडायला तयार आहे. मी १०० टक्के मुद्दल फेडेन; पण व्याज देणार नाही. सोबतच त्याने भारतीय प्रसार माध्यम आणि राजकीय नेत्यांवरही पक्षपातीपणाचा आरोप केला.


काय म्हणाला मल्ल्या?

विजय मल्ल्याने एकूण ३ ट्विट केले. त्यात तो म्हणतो, ''गेल्या ३ दशकांपासून किंगफिशर समूह भारतात मद्यव्यवसाय करत आहे. यादरम्यान कंपनीने अनेक राज्यांना मदत देखील केली आहे. किंगफिशर एअरलाइन्सनेही सरकारला सहकार्य केलं. पण दुर्दैवाने किंगफिशर एअरलाइन्स तोट्याने गेल्याने बंद करावी लागली. असं असलं, तरी मी बँकांना कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार आहे. यामुळे बँकांचेही नुकसान होणार नाही.''

दुसऱ्या ट्विटमध्ये मल्ल्या म्हणाला, ''किंगफिशर एक शानदार एअरलाइन्स होती. विमानाचं इंधन महागल्याचा किंगफिशरला फटका बसला. १४० प्रति बॅरल अशा महागड्या इंधनाचा किंगफिशरला सामना करावा लागला. यामुळे एअरलाइन्सचा तोटा वाढत गेला. बँकांकडून घेतलेलं कर्ज नुकसान भरून काढण्यातच गेलं. मी बँकांचं १०० टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी.''

तिसऱ्या ट्विटमध्ये मल्ल्या म्हणाला, ''प्रसारमाध्यमं आणि नेतेमंडळी माझ्यावर बँकांचे कर्ज बुडवून पसार झाल्याचा सातत्याने आरोप करत आहेत. पण हे सगळं खोटं आहे. माझ्यासोबत नेहमीच पक्षपातीपणा करण्यात आला. मी कर्नाटक हायकोर्टात कर्ज फेडण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्याकडेही सर्वांनी दुर्लक्ष केलं.''

विजय मल्ल्या मार्च २०१६ पासून ब्रिटनमध्ये असून १८ एप्रिलला स्काॅटलँड यार्ड पोलिसांनी प्रत्यार्पण वाॅरंटवर त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला तात्काळ जामिनावर सोडून देण्यात आलं. सध्या विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं असून याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहे.हेही वाचा-

विजय मल्ल्या प्रत्यार्पण: सीबीआयनं लंडनला पाठवला आर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओ

मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या