मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल

 Mumbai
मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल

मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. इंग्लडमधील कोर्टाने मल्ल्याला दिलासा देऊनही भारतातील तपास यंत्रणांनी त्याच्या विरोधातील फास आवळायला सुरुवात केली आहे. भारतीय बॅंकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून पळालेल्या मल्ल्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने मुंबई कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.


हेही वाचा - 

विजय माल्ल्या लोन चुकवेगिरी प्रकरणी 1100 पानी आरोपपत्र

चोर चोर!


मनी लॉड्रिंग प्रकरणी आयडीबीआय बॅंकेचे 900 कोटींचे कर्ज थकवल्याप्रकरणी मल्ल्याविरोधात 57 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 2009 साली किंगफिशर एअरलाईन्स ही विमानकंपनी तोट्यात असताना देखील बॅंकेने 900 कोटींचे कर्ज दिले होते. यापैकी 300 कोटी हे देशात तर उर्वरित 600 कोटी हे परदेशात गुंतवण्यात आले होते. मंगळवारी वेस्ट मिनिस्टर दंडाधिकाऱ्यांनी 4 डिसेंबरपर्यंत मल्ल्याला जामीन मंजूर केला होता. यावेळी मल्ल्याने आपण कशाप्रकारे निर्दोष आहोत, याचा गवगवा देखील केला होता.

Loading Comments