पॅरोलवरील आरोपीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार


पॅरोलवरील आरोपीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
SHARES

राजकीय वादातून हत्या केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने पॅरोलवर बाहेर येत २०१६ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अपहरण करून अत्याचार केले. अाता २ वर्षानंतर या फरारी अारोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. सुजीत उर्फ पप्पू   कुऱ्हाडे (३५) असं आरोपीचं नाव आहे.


भोसरीत अपहरण

ठाणे परिसरात राहणाऱ्या सुजीतने २०११ मध्ये राजकीय वादातून शिवा रघुनाथ जैस्वालची हत्या केली होती. याप्रकरणी पप्पूसह त्याचे भाऊ रितेश कुऱ्हाडे व सुनील कुऱ्हाडे यांनाही ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती. २०१२ मध्ये न्यायालयाने तिन्ही भावांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पप्पूची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. ६ ऑक्‍टोबर २०१६ मध्ये त्याने ३० दिवसांचा पॅरोल घेतला. त्यानंतर तो फरार झाल्याने घाटकोपर पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पॅरोलवर असताना भोसरी येथील एका अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केला. याप्रकरणी भोसरी पोलिस त्याचा शोध घेत होते. 


पुण्यात वास्तव्य

पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी पप्पू पुण्यात वास्तव्याला होता. दोन वर्षापासून पोलिस सुजीतच्या मागावर होते. अखेर गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांना सुजीत पुण्यात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पुण्यातील भोसरी परिसरात तो नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक आनंद बागडे, पो. नाईक मोरे व शिपाई ताजणे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सापळा रचून पप्पूला अटक केली.



हेही वाचा - 

सोनाक्षी सिन्हाने मागवले हेडफोन, मिळाला नळाचा व्हॉल्व्ह




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा