सोनाक्षी सिन्हाने मागवले हेडफोन, मिळाला नळाचा व्हॉल्व्ह

सोनाक्षी सिन्हानं अॅमेझॉनवरून १८ हजार रुपयांचे बोसचे हेडफोन मागवले होते. मात्र पार्सलची डिलिव्हरी आल्यानंतर त्यामध्ये चक्क लोखंडी नळाचा तुटलेला व्हॉल्व्ह मिळाला.

SHARE

आजकाल अनेक लोक बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंग करणं पसंत करतात. पण ऑनलाईन शॉपिंगवेळी 'मागवलं काय आणि आलं काय' असा धक्कादायक अनुभव अनेकांना अाला अाहे. आता मात्र चक्क बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचीच फसवणूक झाली अाहे.  सोनाक्षीने अॅमेझॉनवरुन बोसचे हेडफोन मागवले होते. पण तिला कुरिअरनं तुटलेल्या नळाचा व्हॉल्व्ह पार्सलमधून दिला.अॅमेझॉनकडून प्रतिसाद नाही

सोनाक्षी सिन्हानं अॅमेझॉनवरून १८ हजार रुपयांचे बोसचे हेडफोन मागवले होते. मात्र पार्सलची डिलिव्हरी आल्यानंतर त्यामध्ये चक्क लोखंडी नळाचा तुटलेला व्हॉल्व्ह मिळाला. याबाबत सोनाक्षी सिन्हानं तिच्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली असून अॅमेझॉनकडं तक्रारही केली. मात्र, तक्रारीला अॅमेझॉनकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


१८ हजारांना नळाचे तुकडे

या ट्वीटनंतर सोनाक्षीनं आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये तिनं 'कुणाला नळाचे तुकडे घ्यायचे का, तेही १८ हजार रुपयांना', अशी विचारणा करत अॅमेझॉनला सुनावलं आहे. सोनाक्षीच्या या ट्वीटनंतर अॅमेझॉनने ही चूक लक्षात घेत तिच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे. या चुकीबद्दल अॅमेझॉन इंडियाने माफी मागितलं असून पुढील मदतीसाठी तिच्याकडे डिटेल्सचीही मागणी केली अाहे. 
हेही वाचा-

हिरे व्यापारी हत्याकांडात सातव्या आरोपीला अटक

लोकशाहीविरूद्ध लढण्याचा धडा देणारी वेबसाईट ब्लाॅकसंबंधित विषय
ताज्या बातम्या