प्रतिबंधित औषधं विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक

स्काइपद्वारे अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून ही टोळी त्यांना अमेरिकेतून बोलत असल्याचे भासवत होती. समोरील व्यक्तीला त्या ठिकाणी बंदी घातलेली उत्तेजक औषध देण्याचे आमीष दाखवून त्याच्याकडून दुपटीने पैसे उकळायची.

प्रतिबंधित औषधं विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक
SHARES

बोगस काॅल सेंटर चालवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या १० जणांना गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अटक केली आहे. व्हायग्रासारखी प्रतिबंधित औषधं विकण्याच्या नावाखाली या टोळीने शेकडो अमेरिकन नागरिकांना लाखो डाॅलर्सला गंडवल्याचं तपासात पुढे आलं आहे.


मरोळमध्ये काॅल सेंटर

 अंधेरीच्या मरोळ परिसरातीस एमआयडीसीतील नंदधाम इडस्ट्रीजमध्ये बोगस काॅल सेंटर एल्वीस पीटर न्यूनेस (३९) याने सहकारी मोहम्मद इरफान मदार शेख (२५), अब्दुल हमीद शेख (२४), योगेश सुरेश जाधव (२९), रोहित राजेंद्र सिंग (२३), मेहुल जयंतीलाल सवेरिया (३१), मॉरिस हॉलंड (२२) व निखिल देवोल (२५) व जसविंदर गुरुविंदर सिंग (३६) मदतीने सुरू केले होते. 'मी टेक्‍नोलॉजी प्रा. लि' या नावाने हे काॅल सेंटर चालवले जात होते.


स्काइपद्वारे संपर्क 

 स्काइपद्वारे अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून ही टोळी त्यांना अमेरिकेतून बोलत असल्याचे भासवत होती. समोरील व्यक्तीला त्या ठिकाणी बंदी घातलेली उत्तेजक औषध देण्याचे आमीष दाखवून त्याच्याकडून दुपटीने पैसे उकळायची. तसंच त्यांना औषध न पाठवता त्यांची फसवणूक करायचे. 


पोलिसांचा छापा

याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे पोलिस निरीक्षक अरूण पोखरकर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोखरकर यांच्या पथकाने गुरूवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी यूएस फार्मसीच्या नावाने आरोपी अमेरिकन नागरिकांना दूरध्वनी करून व्हायग्रा, सिआलीस व लिवेट्रा या सारख्या प्रतिबंधित औषधांच्या विक्रीच्या नावाखाली ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. 


भाडे तत्त्वावर कॉल सेंटर

या सेंटरचा मालक एल्वीस पीटर असून त्याने भाडे तत्त्वावर हे कॉल सेंटर चालवण्यासाठी घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अारोपींविरोधात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४१९, ४२०, ३४ भा.द.वि.सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम ६६ (ब) व ७२ (अ), भारतीय टेलिग्राम अधिनियमच्या २५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी हे पगारी नोकर असून प्रत्येक नव्या क्लायंटमागे त्यांना बोनस पैसे दिले जायचे.हेही वाचा - 

गोरेगावमध्ये मुलाकडून अाईची हत्या

Video- अग्निकांड! सायनमध्ये अज्ञातांनी १६ दुचाकी जाळल्या
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा