गोरेगावमध्ये मुलाकडून अाईची हत्या

रोजच्या दोघींच्या वादाला कंटाळलेल्या आनंदला राग अनावर झाल्याने त्याने पहिल्यांदा पत्नीला गंभीर मारहाण केली. त्यानंतर त्याने वृद्ध आईलाही मारहाण केली. राग अनावर झालेल्या आनंदने चाकूने आईवर तीन ते चार वार केले.

गोरेगावमध्ये मुलाकडून अाईची हत्या
SHARES

आई आणि पत्नीत सतत होणाऱ्या वादाला कंटाळून गोरेगावमध्ये मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. सरस्वती विश्वकर्मा असं मृत वृद्ध महिलेचं नाव आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आनंद लालजी विश्वकर्मा याला अटक केली अाहे.


 प्राॅपर्टीवरून वाद

गोरेगाव पूर्वमधील पाच बावडी परिसरात आनंद पत्नी-मुले आणि आईसोबत राहत होता. मागील अनेक दिवसांपासून प्राॅपर्टीवरून आनंदची पत्नी आणि त्याची आई सरस्वती यांच्यात वाद व्हायचे. हे वाद इतके विकोपाला जायचे की कुटुंबातील वृद्धांच्या मदतीने दरवेळी आनंद हा वाद मिटवायचा. मात्र कालांतराने पुन्हा क्षुल्लक कारणांवरून त्यांचे वाद व्हायचे. 


चाकूने वार

बुधवारी काही कारणांवरून दोघींमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी आनंद घरी होता. रोजच्या या दोघींच्या वादाला कंटाळलेल्या आनंदला राग अनावर झाल्याने त्याने पहिल्यांदा पत्नीला गंभीर मारहाण केली. त्यानंतर त्याने वृद्ध आईलाही मारहाण केली. राग अनावर झालेल्या आनंदने चाकूने आईवर तीन ते चार वार केले. 


उपचारादरम्यान मृत्यू 

शेजाऱ्यांनी  अानंदला थांबवत त्याची आई सरस्वतीला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डाॅक्टरांनी तिला कूपर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिली. कूपर रुग्णालयात सरस्वती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आनंदला अटक केली.हेही वाचा - 

Video- अग्निकांड! सायनमध्ये अज्ञातांनी १६ दुचाकी जाळल्या

पॅरोलवरील आरोपीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा