डी कंपनी पुन्हा हादरली, छोटा शकीलचा भाऊ अन्वरला अबूधाबीत अटक

अन्वर विरोधात सुरक्षा यंत्रणांनी रेड काॅर्नर नोटीस जारी केली होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी अन्वर अबूधाबी विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला तेथील सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेत अटक केली.

डी कंपनी पुन्हा हादरली, छोटा शकीलचा भाऊ अन्वरला अबूधाबीत अटक
SHARES

डी. कंपनीचा कुख्यात डाॅन छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबूमिया शेख याला शुक्रवारी अबूधाबी विमानतळावर तेथील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. अन्वर विरोधात या पूर्वीच रेड काॅर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. अन्वर हा सध्या आयएसआयशी संबधित दहशतवाद्यांच्या संपर्कात राहून भारतात घातपाती कारवाई करण्याच्या व्यूव्हरचनेत सहभागी होता. अन्वरच्या अटकेमुळे डी कंपनीशी संबधित अनेक महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. अन्वरचा ताबा घेण्यासाठी पाकिस्तानी यंत्रणेकडून खटपट सुरू केली आहे.


देहद्रोही कारवायांत सहभागी

मुंबईत १९९३ साली रेल्वेत घडवण्यात साखळी बाॅम्बस्फोटात शकील बाबूमिया शेख उर्फ छोटा शकील हा मुख्य आरोपी आहे. त्यावेळी स्फोटासाठी साहित्य पुरवण्यासाठी त्याने मदत केल्याचं तपासात पुढं आलं होतं. यासह नामकींत व्यक्तींना खंडणीसाठी धमकावणं यासारख्या बऱ्याच देशद्रोही कारवाईत त्याचा सहभाग आहे. याच त्याच्या कामात त्याचा भाऊ अन्वर हा देखील त्याला मदत करायचा.


तरूणांचं ब्रेनवाॅश

डी कंपनीचा बहुतांश कारभार हा सध्या शकील आणि त्याचा भाऊ अन्वर संभाळत होते. नुकीतीच आयएसआय या दहशतवादी संघटेशी डी कंपनीची जवळीकता वाढली होती. ही जवळीकता अन्वरच्या मदतीनेच वाढल्याचं बोललं जाते. भारतातील नवोदित तरुणांची माथी भडकवून त्यांना या दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्यासाठी किंवा भारतात राहून त्यांचा आपल्या कामासाठी अन्वर उपयोग करून घ्यायचा.


ताबा मिळवण्याचा प्रयत्न

त्यामुळेच अन्वर विरोधात सुरक्षा यंत्रणांनी रेड काॅर्नर नोटीस जारी केली होती. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी अन्वर अबूधाबी विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला तेथील सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेत अटक केली. अन्वरच्या अटकेची बातमी भारतीय आणि पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांना मिळताच दोन्ही देशांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.



हेही वाचा-

दाऊदच्या मुंबईतील साम्राज्याला जबरदस्त हादरा!

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला दुबईत अटक



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा