वांद्र्यात बॅग हिसकावणाऱ्या ३ भुरट्या चोरांना अटक


वांद्र्यात बॅग हिसकावणाऱ्या ३ भुरट्या चोरांना अटक
SHARES

मुंबईत वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांचं रस्त्यावरून फिरणं देखील मुश्किल झालं आहे. अशाच एका प्रकरणात वांद्रे पोलिसांनी ३ भुरट्या चोरांना अटक केली आहे. रस्त्यावर चालताना या ३ सराईत चोरट्यांनी एका प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्याची बॅग हिसकावली होती. परंतु पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली. रमेश नागरी, आरफाज खान, शादाब शेख अशी या आरोपींची नावे आहेत.


'अशी' केली चोरी

मुंबईच्या एका नामकिंत कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेले सचिन करकेरा शनिवारी वांद्रे येथून दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी सहकुटुंब जात होते. रात्री ३.१५ वाजेच्या सुमारास ते साधू वासवानी चौकात पोहोचले असताना मागून दुचाकीहून आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातावर जोरदार फटका मारला तर दुसऱ्याने त्यांच्या हातील बॅग हिसकावून तिघांनीही पळ काढला.

यानंतर सचिन यांनी तातडीने वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने ठिकठिकाणी नाकांबंदी लावत आरोपींचा शोध सुरू केला.


'अशी' झाली अटक

दरम्यान पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर सुरू असलेल्या नाकाबंदीत एका दुचाकीवर ३ तरूण संशयीतरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याजवळ सचिन यांनी दिलेल्या माहितीतली बॅग आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली. या आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना लुबाडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.



हेही वाचा-

विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या महिलेला अटक

दाऊदला लागोपाठ दोन झटके, भारताला मिळणार पुतण्याचा ताबा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा