अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना १० वर्षाची शिक्षा

कुरिअरच्या माध्यमातून हे तिघे परदेशात अंमली पदार्थांची तस्करीकरत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. न्यायालयाने या तिघांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना १० वर्षाची शिक्षा
SHARES

अंमली पदार्थांची तस्करी करमाऱ्या तिघांना २०१४ मध्ये डीआरआय (महसूल गुप्तचर महासंचालनालयाने) अटक केली होती. कुरिअरच्या माध्यमातून हे तिघे परदेशात अंमली पदार्थांची तस्करीकरत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. न्यायालयाने या तिघांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. किरण कुमार, अलिशान शर्मा, किरण जंगले अशी या तिघांची नावं आहेत


'अशी' करायचे तस्करी

अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात 'डीआरआय'ने फेब्रुवारी २०१४ मध्ये एक कारवाई करत ९ किलो केटामाईन, साडेतेरा किलो मिथॅम्पफेटामाईन जप्त केलं होतं. पोलिस तपासात हे अंमली पदार्थ लंडनहून एका कुरियरने पाठवण्यात आल्याचं पुढं आलं. पोलिसांनी या प्रकरणी खोलवर जाऊन तपास करण्यास सुरूवात केल्यानंतर अन्न पदार्थांच्या नावाखाली ही टोळी लंडनमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचं निदर्शनास आलं.

यात अंधेरी येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक असलेला व लंडनमधून शिक्षण पूर्ण करुन आलेला अलिशान शर्मा हा प्रमुख आरोपींपैकी एक होता. लंडनमध्ये रात्रीच्या विविध पार्ट्यांमध्ये हशीश व मिथॅम्पफेटामाईनचा वापर केला जात असे.


हवालातून मोठी रक्कम

भारतातील नामांकित अंमली तस्करांकडून हे तिघे ड्रग्जची खरेदी करत होते. त्यानंतर पुढे किरण हा खाद्यपदार्थाच्या बाॅक्समधू हे अंमली पदार्थ कुरियर कंपनीच्या मदतीने परदेशात पाठवायची. या तस्करीत हे तिघे परदेशातील व्यक्तीकडून हवालाच्या माध्यमातून मोठी रक्कम मिळत होते.

हा सर्व व्यवहार किरण कुमार हा पाहायचा प्रत्येकाने स्वतः ची जबाबदारी ही वाटून घेतली होती आणि त्याचप्रमाणे पैसे ही, या तिघांना डिआरआयने रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला डीआरआयने चालवला. त्यावर सुनावनी देताना एनडीपीआरएस न्यायालयाने त्यांना १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.



हेही वाचा-

गुंड टी. पी. राजाच्या हत्येप्रकरणी आरोपीला राजस्थानातून अटक

गुप्तांगात अंमलीपदार्थ लपवून आणणाऱ्या महिलेची निर्दोष मुक्तता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा