झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरांसाठी बनावट कागदपत्र

वरळीच्या शिवनगर सहकारी गृहनिर्माण योजनेत बनावट कागदपत्रांच्या आधारावर घर बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरांसाठी बनावट कागदपत्र
SHARES

वरळी येथे शिवनगर सहकारी गृहनिर्माण योजनेत बनावट कागदपत्रांच्या आधारावर घर बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


विद्युत बिलही बनावट

वरळीच्या शिवनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे एसआरए प्रकल्प राबवला जात आहे. या ठिकाणी अनधिकृतरित्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. मात्र या प्रकल्पातील अटीनुसार वास्तव्याचा पुरावा म्हणून आरोपी यासीम सलीम बोहरी, अमिन बोहरी, कनीज बोहरी, मुमताज मुल्ला मुस्तफा यांनी बनावट कागदपत्रं बनवली. मात्र या कागदपत्रांमध्ये पालिका आणि बेस्टतर्फे करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठा बिल गरजेचं असल्यानं या आरोपींनी विद्युत बिलही बनावट बनवून झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणास सादर केलं.


शासकीय लोकसेवकांचाही हात?

या चौकडीच्या कारनाम्यांची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या प्रकल्पातील नागरिकांची कागद पडताळणी करताना चौघांचा बनाव उघडकीस आला. त्यानुसार संतोषकुमार पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०,४६५,४६८,४७१,१७७,१९८(३),१९९,२०० आणि १२०(ब) अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात काही शासकीय लोकसेवकांचाही हात असल्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली असून पोलिस त्या अनुशंगाने तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा