अय्याशीसाठी बनला चोर

दहीसर - स्वत:च्या मजामस्तीसाठी महागड्या गाड्यांची चोरी करणाऱ्या एका ठगास पोलिसांनी अटक केली आहे. या चोराने वेगवेगळ्या विभागातून तब्बल महागड्या 8 गाड्या चोरी केल्या होत्या. हा आरोपी एका कंपनीत काम करत होता. मात्र पैशाच्या अति हव्यासामुळे त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला. या चोरट्याच्या वडिलांचे गाड्यांच्या सामानाचे दुकान आहे. या दुकानाच्या बाजूला एक गाड्यांचे गॅरेज आहे. या गाड्यांच्या गॅरेजमधून या भामट्याने बनावट चाव्या कशा बनवता येतील हे शिकून घेतलं आणि त्याने या गाड्या चोरण्यास सुरूवात केली. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या भामट्याला पकडले असून, त्याच्यासोबत अजून कोण आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच त्याने कोणत्या कंपनीच्या आणि अजून किती गाड्या चोरल्या याचा तपास पोलीस करत आहेत.

Loading Comments