बिनव्याजी कर्जाच्या नावाखाली फसवणूक, खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


बिनव्याजी कर्जाच्या नावाखाली फसवणूक, खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
SHARES

मुंबईत ताळेबंदी त्यानंतर आलेल्या कोरोना संक्रमणामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असताना. अनेक जण नव्याने व्यवसायाची सुरूवात करून पून्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पैशांची जमवा जमव  करण्यासाठी मिळेत तेथून कर्ज घेत आहेत. अशाच गरजूंना बिनव्याजी कर्जाचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक करून पून्हा त्यांच्याकडेच खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मानुखुर्द पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे अधिका-याने सांगितले.

हेही वाचाः- रोज  १२ हजार मुंबईकरांना मिळणार कोरोना लस

मानखुर्दच्या टी जंक्शन परिसरात राहणारे हस्तगीर इब्राहिम शेख(३५) हे मानखुर्द टी जंक्शन येथील रहिवासी आहेत. त्यांना नवा व्यवसाय सुरू करायचा होता, तसेच त्याच्या आईची तब्येतही ठीक नसल्यामुळे उपचारासाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला. आरोपीने बिन व्याजी कर्ज देण्याचे आमीष त्यांना दाखवले. बिन व्याजी कर्ज मिळत असल्यामुळे शेख यांनीही तात्काळ ५० लाख रुपयांचे कर्जाची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी शेख यांच्याकडून पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेची माहिती आदी कागदपत्र घेतले. आता सर्व सुरूळीत होते, असे वाटत असतानाच आरोपींनी बिनव्याजी कर्ज देणे हे कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा असून तुमच्यावर गुन्हा दाखल होत असल्याचे सांगितले. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी भीती तक्रारदाराला दाखवली. सुरूवातील शेख यांनी भीतीपोटी काही रक्कम आरोपींना दिली. त्यानंतर आरोपींनी त्याला पैशांसाठी धमकवण्यास सुरूवात केली. त्या अंतर्गत आरोपींनी तक्रारदार शेख यांच्याकडून १२ लाख २५ हजार रुपये उकळले.

हेही वाचाः- भारत-इंग्लंड विमानसेवा 'ह्या' तारखेपासून पुन्हा सुरू

पण त्यानंतरही ते थांबले नाही. त्यांनी नुकतीच तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. नेहमीच्या या धमकावण्याला कंटाळून अखेर याप्रकरणी शेख यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३८६, ३८७, ४२०, ५०६(२),३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अझीमुद्दीन शहादत अली कुडाळकर(४८) याला अटक केली. याप्रकरणी जमाल आली काझी, वकील आमीर सिद्धीकीसह आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सहभागाबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून यावर्षी २ जानेवारीपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा