Advertisement

भारत-इंग्लंड विमानसेवा 'ह्या' तारखेपासून पुन्हा सुरू

मुंबई-लंडन हिथ्रो आणि दिल्ली-लंडन हिथ्रो अशी ही विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडियाने तिकिटांचं बुकिंग सुरू केलं आहे.

भारत-इंग्लंड विमानसेवा 'ह्या' तारखेपासून पुन्हा सुरू
SHARES

काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा विषाणू आढळला होता. त्यामुळे भारत सरकारने खबरदारी म्हणून २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भारत-ब्रिटन विमानसेवा स्थगित केली होती. त्यानंतर ही स्थगिती ७ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवली होती. मात्र, सरकारने आता ही स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारत-इंग्लंड यांच्यातील विमानसेवा ८ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई-लंडन हिथ्रो आणि दिल्ली-लंडन हिथ्रो अशी ही विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडियाने तिकिटांचं बुकिंग सुरू केलं आहे. मात्र, प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आणि विमानतळावर स्वखर्चाने चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, ६ जानेवारीला मुंबई आणि दिल्ली येथून लंडनसाठी विमाने उड्डाण घेतील. त्यानंतर इंग्लड येथून ८ जानेवारीला भारतासाठी विमाने उडान घेतील. एका आठवड्यात १५ - १५ अशी एकूण ३० विमानांची ये-जा दोन्ही देशांदरम्यान होणार आहे. २३ जानेवारीपर्यंत हे वेळापत्रक कायम राहील. त्यानंतर पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. 



हेही वाचा -

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा