चहावाल्याला लाखोंचा गंडा घालणार ठग अटकेत


चहावाल्याला लाखोंचा गंडा घालणार ठग अटकेत
SHARES

माटुंगा - एसआरए योजनेतील घर स्वस्तात घेऊन देतो असे सांगून एका चहावाल्याला लाखो रुपयाचा गंडा घालणाऱ्या ठगास शाहूनगर पोलिसांनी अटक केली. गोपाळ कृष्णन नाडर असे ठगाचे नाव असून, तो माटुंगा लेबर कॅम्पातील रत्नमहाल टॉवरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धारावी माटुंगा लेबर कॅम्पातील एका चाळीत राहणारा एस. पेरुमल षण्मुगम यादव आपल्या घराशेजारी चहाची टपरी लावून चहाचा धंदा करीत होता. त्यावेळी एक ग्राहक म्हणून गोपाळ कृष्णन नाडरची पेरुमल यादवची चांगली ओळख झाली. तेव्हा पेरुमल यादवला एका मित्राने गोपाल कृष्णन नाडर हे माटुंगा लेबर कॅम्पात साई एकता सहकारी सोसायटी नावाची इमारत बनवीत असून, ते स्वस्तात घर देणार असल्याचे सांगितले. पेरुमलला घराची आवश्यकता असल्याने त्याने मित्राला घेऊन गोपाल कृष्णनचे घर गाठले. दरम्यान चतुर गोपाळ कृष्णन याने फोटोपास असलेली दोन घरे त्यांना दाखविली आणि एका घराचे 8 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले. 2008 मध्ये अॅडव्हान्स म्हणून पेरुमल यादव यांनी 1 लाख रुपये गोपाल कृष्णनला दिले आणि करार झाल्याप्रमाणे उर्वरित रक्कम 7 लाख 50 हजार हजार रुपये दिले.

या ठगाने शबाना अजीज अहमद शेख आणि प्रमिला एस ओव्हाळ या अनोळखी महिलेच्या नावाचा वापर करून त्यांच्या बनावट सहीसह करारनामा आणि शपथ पत्र घरातच बनवून दिले. काही वर्षांतच इमारतीचे काम पूर्ण झाल्याने पेरुमल यादव ने घराच्या मागणीसाठी गोपाल कृष्णनची भेट घेतली असता इमारतीमध्ये खोल्या रिकामी नसल्याचे सांगत गोपाल कृष्णन काढता पाय घेतल्याने पेरूमलचा संशय बळावला त्याने तात्काळ इमारतीत जाऊन खोलीची तपासणी केली असता त्याने विकत घेतलेल्या खोलीत तिसराच इसम राहत असल्याचे दिसून आल्याने पेरुमलचा माथा ठणकला आणि गोपाल कृष्णनशी शाब्दीक चकमक झाल्याने समझोता म्हणून 3 लाख रुपये खोली भाडे आणि 30 लाख रुपये घराची मूळ किंमत देण्याचे गोपाल कृष्णनने मान्य केले. त्याने 3 लाख रुपये खोली भाडे पेरुमलला दिले आणि 10 लाखाचे तीन चेक दिले. दरम्यान दिलेल्या तारखेत चेक वटवण्यासाठी बँकेत गेले असता खात्यात पैसे नसल्याने चेक बाउंस झाले त्यावरून दोघात वाद झाला यामुळे पेरुमल यादवने तात्काळ शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता शाहूनगर पोलिसांनी 2008 व 2015 रोजी खोली विक्रीचा खोटा करारनामा, जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी आणि शपथपत्र बनावट दस्तावेज बनवून फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा