नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार

१ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावनी सुरू असताना न्यायालयाने हे बांधकाम अनधिकृत असताना यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न केला? त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या बंगल्याच्या बांधकामासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर या बंगल्याचं बांधकाम करताना महसूल आणि सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याचे निदर्शास आलं.

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार
SHARES

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहारा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग येथील आलिशान बंगला पाडण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अलिबागच्या किहिम सुमद्रकिनारी हा अलिशान बंगला आहे. महसूल आणि सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत.


ईडीची कारवाई

अलिबागमधील किहीम गावात नीरव मोदीचा तर मेहुल चोक्सीचा आवास गावात बंगला आहे. पंजाब नॅशनल बँकेतलं गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्तेवर ईडीने छापे मारले. त्यावेळी अलिबागच्या बंगल्यावर ईडीने कारवाई केली होती.


सीआरझेड कायद्याचं उल्लंघन

या प्रकरणावर १ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावनी सुरू असताना न्यायालयाने हे बांधकाम अनधिकृत असताना यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न केला? त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या बंगल्याच्या बांधकामासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर या बंगल्याचं बांधकाम करताना महसूल आणि सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याचे निदर्शास आलं.


कलम १५ अंतर्गत कारवाई

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नीरव मोदीचा हा बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १ लाख रुपये दंडापासून ५ वर्षे कैद अशा शिक्षेची तरतूद आहे.



हेही वाचा-

नीरव मोदीची ६३७ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

नीरव मोदी, मेहुल चोक्सीचा बंगला तोडणार!



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा