फरार आरोपीला १७ वर्षानंतर अटक, लगेच सुटका


फरार आरोपीला १७ वर्षानंतर अटक, लगेच सुटका
SHARES

कुर्ला - फरार आरोपीला पोलिसांनी तब्बल १७ वर्षानंतर सोमवारी अटक केली खरी, मात्र काही वेळातच अवघ्या ५०० रुपयांच्या जामिनावर त्याची सुटकाही झाली. अत्ताउल्ला उर्फ राजू मुस्तफा खान असं या आरोपीचं नाव असून काही दिवसांपूर्वीच त्याला कुर्ला पोलिसांनी १९९४मध्ये केलेल्या चोरीबद्दल अटक केली होती.
१९९४मध्ये अत्ताउल्लाने कुर्ल्यातल्या एका दुकानातून २ हजार रुपयांचा मोटारपंप चोरला होता, पोलिसांनी काही वेळातच त्याला अटकही केली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं, कोर्टात केस सुरू झाली अत्ताउल्ला खानला जामीन मिळाला आणि १९९८मध्ये तो फरार झाला. न्यायालयात हजार न राहिल्याने जून १९९९ त्याला रीतसर फरार घोषित करण्यात आलं.
अत्ताउल्लानं नंतर कुटुंबीयांशीही संपर्क तोंडला आणि तो मालवणीत स्थायिक झाला. पोलिसांनी कुर्ला आणि परिसरात शोध घेतल्यावर तो कधी सापडलाच नाही.
दोन वर्षांपूर्वी आईचं निधन झाल्यानंतर तो पुन्हा कुटुंबीयांच्या संपर्कात आला. कुटुंबीयांशी त्याचा मालमत्तेवरून वाद सुरू झाला आणि त्याची कारस्थानं माहित असल्यानं कुटुंबीयांनीच अत्ताउल्लाची माहिती कुर्ला पोलिसांना दिली आणि कुर्ला पोलिसांनी त्याला पुन्हा गजाआड केलं. कोर्टानं ५०० रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा