कुणाकडूनही लिफ्ट घेऊ नका, नाहीतर लुटले जाल!


कुणाकडूनही लिफ्ट घेऊ नका, नाहीतर लुटले जाल!
SHARES

मुंबई, नवी मुंबई याठिकाणी जाण्यासाठी रात्रीच्या वेळी गरजू प्रवाशांना शेअरींगवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारने अटक केली आहे. नूर आलम, देपू मारवाडी, सलमान, मोहम्मद अमीर आणि छोटू अशी अटक करणाऱ्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून चाकू, सुरा आणि फायटर आदी शस्त्र जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबई, नवी मुंबई येथे रात्रीच्या वेळेस जाण्यासाठी अनेक प्रवाशांना कोणतेही जलद वाहन मिळत नाही. नेमके असे प्रवासी हेरून त्यांना शेअरिंगवर घेऊन जाण्याचे आमिष दाखवून त्यांना भर रस्त्यात लुटून पळ काढला जाई. अशा अनेक तक्रारी मुंबई तसेच नवी मुंबई पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. याचा तपास करण्यास गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारने सुरुवात केली होती.

अशातच यातील काही संशयित हे वडाळा येथील राहणारे असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून या पाच जणांना अटक केली. या माथेफिरूंनी एका महिलेला देखील लुटून तिच्या क्रेडिट कार्डवरून पैसे काढल्याचे समोर आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय