ड्रग्ज तस्करी प्रकरणात गँगस्टर चिंकू पठाणला अटक


ड्रग्ज तस्करी प्रकरणात गँगस्टर चिंकू पठाणला अटक
SHARES

मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथक ने धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा  नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबई अंमली पदार्थ तस्करी करण्याचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमली विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाण पकडले आहे. त्याला नवी मुंबईतील घनसोली येथून अटक करण्यात आली आहे. अंमली विरोधी पथकाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक आहे. तसंच तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर मुंबई अंमली पदार्थ तस्कारांना मोठा हादरा बसला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा